Vedmurti Shrikant Madhav Kelkar Guruji,

केळकर गुरुजींबद्दल

श्री. श्रीकांत माधव केळकर यांचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले, मुंबई येथून झाले.  पूर्वीच्या पार्ले महाविद्यालयातून (आताचे साठ्ये महाविद्यालय) विज्ञान विषयांसह १२ वी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी माटुंगा, मुंबई येथील  विक्टोरिया ज्युबिली तांत्रिक संस्थेतून (आताची वीर जिजामाता तांत्रिक संस्था) 'कापड अभियंता पदविका' अभ्यासक्रम पूर्ण केला.  नंतर त्यांनी माटुंगा, मुंबई येथील वेलिंगकर संस्थेतून 'व्यवस्थापन पदविका' प्राप्त केली.   ते मुंबई विद्यापीठाचे मानसशास्त्र विषयाचे पदवीधर आहेत. शिक्षण पूर्ण केल्यावर, सुमारे १५ वर्षे कापड व्यवसायाशी संबंधित कारखान्यांतून / आस्थापनांतून त्यांनी निरनिराळ्या अधिकारपदांवर नोकरी केली.

अनेक वर्षे निरनिराळ्या गुरुंकडून त्यांनी याज्ञिकी, ऋग्वेद संहिताज्योतिषशास्त्र अभ्यास पूर्ण करुन विद्या संपादन केली आहे.  प्रवास, वन्यजीव प्रकाशचित्रण, एक्युप्रेशर , योगसाधना, संगीत ऐकणे, वाचन, समाजकार्य, इ. गोष्टीत गुरुजींना रस आहे.

 

वेदमूर्ती श्री.श्रीकांत माधव केळकर (गुरुजी) यांनी इ.स. २००० नंतर पूर्णवेळ व स्वतंत्रपणे 'पौरोहित्य' सेवा पुरवण्यास सुरुवात केली.  गेल्या २० पेक्षा जास्त वर्षात त्यांनी निरनिराळ्या यजमानांसाठी अनेक विधी / संस्कार उत्तम पौरोहित्य सेवा देऊन, पूर्णपणे समाधानकारकरीत्या पार पाडले आहेत.  परदेशातही अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी यजमानांकरिता निरनिराळे विधी / संस्कार उत्तमरीत्या पार पाडले आहेत.

सर्व हिंदू व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी, वैदिक व सनातन धर्माला अपेक्षित उत्तम पौरोहित्य सेवा पुरवण्याची गुरुजींची मनीषा आहे.

 

वेदमूर्ती श्री.श्रीकांत माधव केळकर गुरुजी खालील सर्व हिंदू संस्कार / विधी उत्तमरीत्या पार पाडतात....

सर्व पूजा, सर्व सोळा संस्कार, विवाह, उपनयन (मुंज), सोडमुंज (समावर्तन), वास्तू शांती, सर्व जननशांती, नवग्रह शांती, उदक शांती, सर्व वयोवस्थाभिध शांती, गृहप्रवेश, भूमिपूजन, लघुरुद्र, महारुद्र, गणेशयाग, नवचंडी, शतचंडी, राक्षोघ्नहोम, सुदर्शनयाग, सप्तशतीपाठ, जप / अनुष्ठान, कुंभविवाह, श्राद्ध, इ.  कोणतीही पूजा / संस्कार / विधी  ते इंग्रजी, मराठी, हिंदी किंवा गुजरातीमधून समजावून सांगू शकतात.

कोणाचीही पत्रिका तयार करुन हवी असल्यास ती देण्यात येईल तसेच विवाहासाठी वधू-वराच्या पत्रिकेचे गुणमेलन करुन देण्यात येईल.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने परदेशस्थ व्यक्तींसाठी गुरुजी “ऑनलाईन” शिकवण्या घेतात. व्यक्तिगत इच्छेनुसार, ऋग्वेदसंहिता, याज्ञिकी, भगवदगीता, कोणतेही संस्कृत सूक्त / स्तोत्र / मंत्र याचे शास्त्रोक्त उच्चारण शिकविले जाते.

तसेच, फेसटाईम / स्काईप च्या माध्यमातून, पूजा, श्राद्ध, लघुरुद्र, सहस्रावर्तने, निरनिराळ्या शांती, मुंज, विवाह इत्यादी सर्व संस्कार / विधी अनेक देशातील यजमानांसाठी नेहमी पार पाडत असतात.

कोणत्याही वैयक्तिक गरजेकरता आपण संपर्क साधू शकताआपले नक्की समाधान होईल याबाबत खात्री बाळगावी.

संपर्क करा